रत्नागिरी : क्रीडा प्रबोधिनीसाठी ४ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Jun 28, 2024 - 14:09
 0
रत्नागिरी : क्रीडा प्रबोधिनीसाठी ४ जुलै पर्यंत  अर्ज   करण्याचे  आवाहन

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने राज्यात क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. २०२४- २५ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत या ९ क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश ५० टक्के व कौशल्य चाचणी ५० टक्के प्रक्रियेंतर्गत खालील निकषानुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहे. विभागस्तर चाचणीकरिता खेळाडूंनी आपले अर्ज रत्नागिरी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात ४ जुलै पर्यंत द्यावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा ९ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. त्या ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, शुटिंग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, अशा १७ क्रीडाप्रकारात प्रशिक्षण देण्यात येते. क्रीडा प्रबोधिनीसाठी खेळाडूचे वय १९ वर्षापेक्षा कमी असावे, या चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाद्वारे चाचणी घेऊन क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवड अंतिम करण्यात येते. विभागस्तरावर चाचण्या ८ ते ९ जुलै या कालावधीत होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow