राज्यातील १३८ उपजिल्हाधिकारी- तहसीलदारांच्या बदल्या

Aug 6, 2024 - 10:32
 0
राज्यातील १३८ उपजिल्हाधिकारी- तहसीलदारांच्या बदल्या

मुंबई : आगामी विधानसभेच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरु झाली असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ लागल्या आहेत. त्यामध्ये ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांच्यासह राज्यातील ७३ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याचे नवीन निवासी उपजिल्हाधिकारी कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर राज्यातील ६५ तहसीलदारांच्याही बदल्या झाल्या आहेत.

राज्यातील कोकण विभागातील सर्वाधिक २३ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. पुणे विभागातील १३ उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजी नगर विभाग १२ उपजिल्हाधिकारी, अमरावती विभागातील ५, नागपूर विभागातील १० आणि नाशिक विभागातील १० असे एकूण ७३ उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र काही रिक्त जागांवर अदयाप नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत. त्यात ठाण्याचे निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांची मुद्रांक जिल्हाधिकारी अंधेरी म्हणून तर कदम ह्यांना रायगड उप जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. उप जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून वैशाली माने हे आता काम पाहतील.

ठाण्याचे उप महानियंत्रक नोंदणी आणि उप नियंत्रक मुद्रक बाळासाहेब खांडेकर यांची मुंबईत एसआरएमध्ये झाली आहे. रविन्द्र हजारे, अपर्णा आरोलकर सोमाणी, प्रकाश सकपाळ, जयश्री कटारे, अजित देशमुख, इब्राहीमी चौधरी, अमित शेंडगे, वैशाली परदेशी ठाकूर, प्रीती पाटील, संदीप चव्हाण, भवानजी आगे पाटील, शीतल देशमुख, प्रशांत सूर्यवंशी, संजीव जाधवर, स्नेहा उबाळे, दत्तात्रय नवले, अश्विनी सुर्वे पाटील, शुभांगी साठे, रोहिणी रजपूत आणि वैशाली माने या ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपजिल्हाधिकारी यांच्याप्रमाणे पुणे विभागातील १२ तहसीलदार, छत्रपती संभाजी नगर विभागातील १५ तहसीलदार, नागपूर ११ तहसीलदार, कोकण विभागातील ९, अमरावती ७ आणि नाशिक ४ तहसीलदार आणि काही तहसीलदारांच्या प्रतिनियुक्तीसह ६५ तहसीलदारांच्या बदल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 06-08-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow