Maharashtra Weather Update पुढील दोन दिवस राज्याच्या या भागात मुसळधार पावसाचा इशारा; 'रेड अलर्ट' जारी

Jun 10, 2024 - 10:57
 0
Maharashtra Weather Update पुढील दोन दिवस राज्याच्या या भागात मुसळधार पावसाचा इशारा; 'रेड अलर्ट' जारी

पुणे : नैऋत्य मान्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूर, नांदेडपर्यंत पोहोचली असून, एक-दोन दिवसांत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तो व्यापेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, राज्यामध्ये काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

महाराष्ट्रात मान्सून गुरुवारी (दि. ६) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये आला होता. त्यानंतर आता तो मराठवाड्यातील आणि प. महाराष्ट्रातील काही भागात पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी मान्सून दक्षिण कोकण आणि बारामतीपर्यंत पोहोचला होता.

त्यानंतर शनिवारी (दि.८) मान्सूनने विश्रांती घेत आपला मुक्काम तिथेच ठोकला. त्यानंतर रविवारी पुणे, मारली. पुढील दोन दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून जाईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (दि. ८) मान्सूनमुळे रत्नागिरी, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली, तर पुणे जिल्ह्यासह लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांत मान्सून पोहोचला. तिथेही काही भागात पाऊस झाला.

रविवारी मात्र राज्यामध्ये पावसाने बहुतांश भागामध्ये विश्रांती घेतली. राज्यात सर्वाधिक पाऊस छत्रपती संभाजीनगर येथे २० मिमी झाला, तर सोलापुरात ०.४ मिमी, मुंबईत ०.२ मिमी, बीड १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

१० व ११ जून रोजी मराठवाडा, विदर्भ, कोकणात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या घाट भागामध्ये आणि सातारा घाट विभागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, पुणे, नाशिक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. ११ जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर भागात आणि घाट विभागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. - माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ, पुणे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow