स्केटिंग राष्ट्रीय खेळाडू रेयांश पराग बने याचा सत्कार

Aug 10, 2024 - 10:54
Aug 10, 2024 - 13:56
 0
स्केटिंग राष्ट्रीय खेळाडू रेयांश पराग बने याचा सत्कार

देवरूख : महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी राष्ट्रीय स्केटिंग पट्ट रेयांश बने याचा विशेष सन्मान आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. रेयांश हा माजी आमदार सुभाष बने यांचा नातू आहे. आमदार रमेश कोरगावकर, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बने यांच्या उपस्थितीत पराग सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून वयाच्या आठव्या वर्षी स्केटिंग या खेळातील भारताचा राष्ट्रीय खेळाडू म्हणून सन्मान मिळालेला रेयांश पृथा पराग बने याचा गौरव करण्यात आला.

रेयांश हा पराग संकुलाचे भविष्य असून रोलर स्केटिंग फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नॅशनल रेटिंग ओपन चॅम्पियनशिप २०२४ गोवा येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले आहे. वयाच्या पाचव्या वर्षी महाराष्ट्रातील बेळगाव या ठिकाणी सतत ९६ तास स्केटिंग करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव समाविष्ट केले आहे.

वेगवेगळ्या स्तरावर स्केटिंग स्पर्धेत भाग घेऊन वयाच्या आठव्या वर्षापर्यंत त्याने २० सुवर्णपदक, ७ रौप्यपदक व ५ कांस्यपदके अशी एकूण ३२ पदके प्राप्त केली आहेत. आता तो भारताचा राष्ट्रीय खेळाडू म्हणून स्केटिंग खेळत आहे. पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी त्याची निवड झाली आहे. कुमार रेयांश हा पराग विद्यालयाचे संचालक पराग बने आणि पराग इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स च्या मुख्याध्यापिका पृथा बने यांचा सुपुत्र आहे. यावेळी आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते रेयांशचा गौरव करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 10/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow