लांजा पोलीस निरीक्षकपदी निळकंठ बगळे

Aug 22, 2024 - 10:48
 0
लांजा पोलीस निरीक्षकपदी निळकंठ बगळे

त्नागिरी : लांजा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी निळकंठ गोपाळकृष्ण बगळे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

लांज्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांची पालघर जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी निळकंठ बगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी श्री. बगळे रत्नागिरीत आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्याअगोदर त्यांनी काही वर्षांपूर्वी राजापूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केले आहे. श्री. बगळे यांची लांजा तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 22-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow