रितेशने जान्हवीला दाखवला बाहेरचा रस्ता?; बिग बॉसचा प्रोमो रिलीज

Aug 24, 2024 - 14:36
Aug 24, 2024 - 15:36
 0
रितेशने जान्हवीला दाखवला बाहेरचा रस्ता?; बिग बॉसचा प्रोमो रिलीज

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा प्रोमो रिलीज झालाय. आज घरात चौथ्या आठवड्यातील भाऊचा धक्काचा प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत रितेशने जान्हवीला चांगलीच अद्दल घडवलेली दिसतेय. इतकंच नाही तर जान्हवीला आज रितेश खऱ्या अर्थाने भाऊचा धक्का देतान दिसणार आहे.

बिग बॉस मराठीच्या प्रोमोत रितेश जान्हवीवर चांगलाच रागावला असून तिला बाहेरचा रस्ता दाखवताना दिसतोय.

रितेशने जान्हवीला दिली मोठी शिक्षा

बिग बॉस मराठीच्या प्रोमोत दिसतंय. रितेश जान्हवीवर चांगलाच रागावलेला दिसतोय. जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला,"जान्हवी तुम्ही 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातील एक वाईट सदस्य आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनस जावं याची लिमिट असते. डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त तीन महिन्यांपूरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात...तुमचा ओव्हर कॉन्फिडिन्स तुम्हाला नडणार आहे".


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:47 24-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow