Breaking : भारतीय वायू दलाचं मिग-21 विमान कोसळलं

Jun 4, 2024 - 13:53
 0

नाशिक : भारतीय वायू दलाच्या (Indian Air Force) विमानाला अपघात झाल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे. नाशिकमध्ये वायूदलाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. वायूदलाचं मिग विमान कोसळल्याची महत्त्वाची बातमी आहे.

नाशिकच्या पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात मिग विमान कोसळलं आहे. वायू दलाचं विमान कोसळण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भारतीय वायू दलाच्या विमानाचा भीषण अपघात

वायू दलाचं विमान नाशिकमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं. वायूदलाच्या मिग विमानाचा भीषण अपघात झाला. मिग विमान कोसळलं, विमानाचे तुकडे-तुकडे झाले आणि त्यानं पेट घेतला. दरम्यान, या दुर्घटनेत सुदैवाने पायलट बचावले आहेत. पायलट पॅराशुटच्या साहाय्याने विमानाबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्या, या अपघाताचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 04-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow