गुहागरच्या तरुणांकडून हिमाचल प्रदेशमधील माऊंट युनाम शिखर सर

Aug 28, 2024 - 11:49
 0
गुहागरच्या तरुणांकडून हिमाचल प्रदेशमधील माऊंट युनाम शिखर सर

गुहागर : गुहागर तालुक्यातील अमोल अशोक नरवणकर आणि विशाल विश्वास साळुंखे यांनी हिमाचल प्रदेशमधील माऊंट युनाम हे ६ हजार १११ मीटर उंचीचे शिखर सर केले आहे. युनाम पर्वत सर केल्यानंतर तिरंगा फडकवीत या दोघांनी मोहीम फत्ते केली. गुहागर तालुक्यात या दोघांच्या कामगिरीची माहिती कळताच अनेकांनी अभिनंदन केले.

पुण्यातील एव्हरेस्ट वीर भगवान चवले यांच्या नेतृत्वाखाली अमोल नरवणकर आणि विशाल साळुंखे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. यासाठी दोघांनाही टीडब्ल्यूजेच्या सह्याद्रीवेडा या ग्रुपने सहकार्य केले. हिमाचल प्रदेशातील मनाली लेह रोडवरील लाहौल स्पिती या परिसरातील भरतपूर बेसवरून ट्रेकिंगला सुरुवात केली. आठ दिवसांत तेथील वातावरणाशी जुळवून घेत मनाली, केलाँग, झिंग झिंग बार व भरतपूरवरून ६ हजार १११ मीटर उंचीचे माऊंट युनाम शिखर सर केले.

अमोल नरवणकर याला पहिल्यापासूनच ट्रेकिंगची आवड आहे. सह्याद्रीवेडा ग्रुपच्या माध्यमातून सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेकवेळा साहसी ट्रेकिंग केले आहे. अशा धाडसी गिर्यारोहणात सातत्य ठेवण्याचा त्याचा विचार आहे. याबाबत विचारले असता, गुहागरातील तरुणांनीही पुढे येऊन या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहिले पाहिजे, असे त्याने सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 28/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow