मंत्री झालो तर अफाट काम करेन.. : सुबोध भावे
मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार राज्यात, देशात सुरु असलेल्या घडामोडींवर व्यक्त होत असतात. त्यांची मतं राजकीय मुद्द्यांवर भाष्य करणारीही असतात. अशाच माध्यमातून अनेक कलाकार हे राजकारणाच्या वाटेलाही जातात.
आतापर्यंत बऱ्याच कलाकारांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला देखील आहे. तसेच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही त्यांच्या राजकीय एन्ट्रीच्या चर्चांना उधाण येतं. त्यातच अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने देखील नुकतच त्याचं राजकारणाकडे वळण्यावर मत व्यक्त केलं आहे.
नुकतच सुबोधने त्याच्या मानापमान सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं. येत्या दिवळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे त्याची कट्यार काळजात घुसली ही कलाकृती देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. इतकच नव्हे तर सुबोध ययाती हा सिनेमा देखील लवकरच घेऊन येणार आहे. दिग्दर्शक, अभिनेता अशा अनेकरुपी भूमिका साकारताना सुबोधला महाराष्ट्राचं सांस्कृतिक पदही सांभाळायला आवडेल असंही म्हटलं आहे. त्यामुळे सुबोध भविष्यात राजकारणाकडे वळणार का? या प्रश्नाचंही उत्तर त्याने दिलं आहे.
'द्या जर महाराष्ट्राचा सांस्कृतिक मंत्री झालो तर...'
एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुबोधने म्हटलं की, राजकारण, समाजकारण ही पूर्णवेळ करण्याची गोष्ट आहे. म्हणजे मी सिनेमाचं शुटींगही करतोय आणि राजकारणरही करतोय, असं होत नाही. मग माझा सिनेमा हा छंद असायला हवा. कारण अभिनय आणि राजकारण हा दोन्ही गोष्टी पूर्णवेळ देऊन करायच्या गोष्टी आहेत. मला सुद्धा राजकारण करायला आवडेल. मला विश्वास आहे, की उद्या जर महाराष्ट्राचा सांस्कृतिक मंत्री झालो तर अफाट काम करेन. पण त्यासाठी मला माझी काम सोडावी लागलीत. हे मला जमणार आहे का? तरच मी त्यामध्ये उतरावं.
'उगाच फेसबुकवर बाण सोडत बसू नका'
पुढे सुबोधने म्हटलं की, 'जर मुद्देच मांडायचे आहेत, एका विषय तुम्हाला पटला नाही, तर तुम्ही अभिनेते आहात, जा त्या व्यक्तीला भेटा आणि तुमचं मत सांगा. मी ज्या गोष्टीमध्ये बदल घडवला, त्यावर मी फक्त फेसबुकवर लिहून गप्प बसलो नाहीये. तिथे प्रत्यक्षात जाऊन मी तो बदल घडवला आहे. तुम्हाला जाऊन तो बदल करता येत नसेल तर उगाच फेसबुकवर बाण सोडत बसू नका आणि गप्प बसा. जे मी आजकाल करतो.'
'सांस्कृतिक मंत्री होणं हे माझ्यासाठी दिवास्वप्न नाही'
हे वक्तव्य मी अजिबात दिवास्वप्न म्हणून करत नाहीये. कारण हे नायक सिनेमासारखं नाहीये. आपल्यालते असे कितीतरी कलाकार आहेत, जे कोणतंही पद नसताना महाराष्ट्रासाठी कामं करतात. ते कुठल्याही संघटनेचे अध्यक्ष नसतात, कुठल्याही पक्षाचे नसतात. या गोष्टीसाठी आम्हाला कुणीही बंधन घातलं नाहीये, हे आम्ही मनापासून करतो. कारण महाराष्ट्राला सामाजिक कार्यात वाहून घेणाऱ्या कलाकारांची देखील परंपरा आहे. पण सांस्कृतिक मंत्री होणं हे माझ्यासाठी दिवास्वप्न नाही. मला खात्री आहे की, माझ्याकडे ते पद आलं तर पुढच्या अनेक पिढ्यांवर चांगला परिणाम होईल असं काम मी करेन, हा विश्वास आहे मला. मला हेही माहियेत की, मी सांस्कृतिक मंत्री होणार नाही. कारण मी सांस्कृतिक मंत्री होण्यात कोणताही राजकीय स्वार्थ साधला जाणार नाही, असं म्हणत राजकारणात येणार नसल्याचंही सुबोधने स्पष्ट केलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:58 31-08-2024
What's Your Reaction?