कसबा येथील गणेशमूर्तीना चढविला जातो वस्त्रांचा साज

Aug 31, 2024 - 16:31
 0
कसबा येथील गणेशमूर्तीना चढविला जातो  वस्त्रांचा साज

साखरपा : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश मूर्तिशाळांमध्ये प्रचंड लगबग दिसत आहे. त्यातच प्रत्येक मूर्तिकार आपापले वेगळेपण टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. असेच एक मूर्तिकार म्हणजे कसबा येथील अविराज कानसरे, कानसरे हे युवा मूर्तिकार वयाच्या दहाव्या वर्षांपासून वडील आणि काकांबरोबर घरच्या मूर्तिशाळेत काम करायला लागले आणि कला अवगत केली. 

गेल्या वर्षी त्यांच्या गणेश मूर्तिशालेची लगबग सुरू झाली आणि अचानक काही कारणाने त्यांना मुंबईला जावे लागले. तिथल्या एका मूर्तिशालेत त्यांनी एक वेगळी मूर्ती पाहिली. त्या मूर्तीला खऱ्या कापडाची तसे नेसवण्यात आली होती. ती मूर्ती अविराज यांना पाहली आणि त्यांनी तशाच मूर्ती कसब्याला आपल्या मूर्तिशाळेत घडवण्याचा ध्यास घेतला.

अशा मूर्ती घडवण्यासाठी आवश्यक साचातील मूर्ती त्यांनी खास मुंबईहून आणली. तिचे रंगकाम झाल्यावर धोतर आणि शेला खऱ्या कापडाचा तयार करून नेसवला योगायोगाने त्यांच्या एका मित्राने ती मूर्ती अविराज यांच्या मूर्तिशाळेत घडताना पाहिली आणि त्यानेही तथीच मूर्ती स्वतःसाठी घडवून देण्याचा आग्रह धरला त्यामुळे गेल्या वर्षी कानसरे यांच्या मूर्तिशाळेत पहिल्या दोन मूर्ती खऱ्याखुऱ्या वस्त्रात साकारल्या. त्या दोन मूर्तींची चर्चा आणि प्रसिद्धी कसबा परिसरात मोठ्या प्रमाणावर झाली.

 यंदा त्यांच्याकडे तशाच खऱ्या वस्त्रातील मूर्ती घडवून देण्याची मागणी वाढली. यंदा कानसरे यांनी तथा १५ मूर्ती तयार केल्या आहेत. दोन फुटांपासून ते पाच आणि सात फुटांपर्यंत या
मूर्ती आहेत. मूर्तीला खरी वश्ले चढवताना रंगसंगतीचा विशेष विचार करावा लागत असल्याचे कानसरे सांगतात.

आधी संपूर्ण मूर्ती रंगवून झाली की, त्या मूर्तीला कोणत्या रंगाचे धोतर, शेला, फेटा चांगला दिसेल याचा विचार करून त्याप्रमाणे बाजारातून कापड आणले जाते.

कापडाला आधी सोनेरी काठ शिवले जातात आणि मग तयार झालेले वस्त्र मूर्तीवर चिकटवले जाते. त्याचप्रमाणे बैठकीसाठीही खरे कापठ वापरले जाते. एक मूर्ती अशी वस्त्रात साकारण्यासाठी सुमारे तीन तास लागतात, यंदा अशा १५ मूर्ती कानसरे यांच्या मूर्तिशाळेत घडत आहेत.

गेल्या वर्षी मुंबईत प्रथम अशी मूर्ती पाहिली आणि माझ्या मूर्तिशाळेत दोन मूर्ती घडवल्या. ही संकल्पना लोकांना खूप आवडल्यामुळे लोकांची मागणी सुरू झाली. यंदा अशा आणखी काही  मूर्ती घडवत आहेत. - अविराज कानसरे, मूर्तिकार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:00 PM 31/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow