महायुतीला पाठिंबा देत जाल, तसं तसं आम्ही तिघे भाऊ ओवाळणीची रक्कम वाढवत नेऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aug 31, 2024 - 16:58
 0
महायुतीला पाठिंबा देत जाल, तसं तसं आम्ही तिघे भाऊ ओवाळणीची रक्कम वाढवत नेऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही. आम्ही शेतकर्याच्या कुटुंबात जन्माला आलेलो आहोत. आम्हीही गरिबी पाहिली आहे. त्यामुळे या योजनेची गरज का आहे, हे आम्हाला कळतं.

1,500 रुपयांचे मोल आम्हाला ठाऊक आहे. जशी जशी तुम्ही आम्हाला ताकद द्याल, महायुतीला पाठिंबा देत जाल, तसं तसं आम्ही तिघे भाऊ ओवाळणीची रक्कम वाढवत नेऊ. अभी तो ये सिर्फ ट्रेलर है, पुरी पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या.. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde)विरोधकांवर घणाघात करत लाडक्या बहिणींशी संवाद साधला.

नागपूरच्या (Nagpur News) रेशिमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंसह इतर महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमात नागपूरसह विदर्भातून हजारोंच्या संख्येने महिलांची मोठी गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले आहे.

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे - एकनाथ शिंदे

महायुतीच्या वतीने आयोजित लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कार्यक्रम उसळलेल्या गर्दीवरुन एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहीणींचे आभार मानत भाष्य केलं. विमानतळावरून येताना खूप ट्रॅफिक होतं, महिलांची मोठी गर्दी उसळली होती. मला इथे पोहोचायला माझ्या बहिणींमुळेच उशीर झाला असल्याचेही ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात 1 कोटी 7 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. आज 52 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले असून उर्वरित महिलांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होतील.

या योजनेला अडीच कोटी महिलांपर्यंत नेण्याचा आमचा उद्दिष्ट आहे. तीन कोटी पर्यंत हे उद्दिष्ट गेले, तरी चालेल. सरकारच्या तिजोरीत असलेला पैसा हा सर्वसामन्यांचा पैसा आहे. या योजनेमुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. त्याचे आम्हाला समाधान मिळतंय. आम्ही दिलेला शब्द पाळतो. म्हणूनच आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. योजनांच्या लाभार्थीच्या संख्येचे रेकॉर्ड तोडले आहे. लवकरच तिसऱ्या टप्प्याचे ही पैसे पाठवू. असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलताना व्यक्त केला आहे.

हे हफ्ते घेणारे नाही तर हफ्ते देणारे सरकार आहे- एकनाथ शिंदे

महायुती सरकार ही योजना बंद होऊ देणार नाही आणि ही योजना कदापी बंद होऊ शकणार नाही. आधी विरोधक म्हणत होते, खात्यात पैसे येणार नाही. आता आले तर ते म्हणत आहेत लवकर काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढून घेईल. आधीचे सरकार हप्ते घेणारे सरकार होतं, मात्र हे सरकार देणारे आहे, हे हफ्ते घेणारे नाही तर हफ्ते भरणारे सरकार असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर घणाघात केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:26 31-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow