अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, रत्नागिरीला २५,००,०००/- ची देणगी

Sep 2, 2024 - 09:04
 0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, रत्नागिरीला २५,००,०००/- ची देणगी

रत्नागिरी : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीची पुढील पाच वर्षाकरिता ची कार्यकारिणी दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी निवडली गेली. शाखेच्या अध्यक्षपदी नाट्य परिषदेचे विश्वस्त ना. श्री. उदय सामंत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. सदर प्रसंगी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या कार्याचा आढावा घेताना व उपक्रमाविषयी मार्गदर्शन करताना ना. श्री उदय सामंत यांनी वर्षभर राबवावयाच्या उपक्रमांसाठी सीएसआर फंडातून काही रक्कम मिळवून देण्याची घोषणा केली.  

सदरची रक्कम फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून त्यावर येणाऱ्या व्याजाच्या रकमेतून उपक्रम राबवावेत अशी सूचना देखील केली. सदरची घोषणा केल्यानंतर अवघ्या १५ दिवसात म्हणजे दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये संपन्न झालेल्या त्यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्या च्या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि  मानवतावादी विचारवंत श्री रघुनाथ माशेलकर तसेच ज्येष्ठ समाजसेवक श्री डॉ. विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेते श्री नाना पाटेकर यांच्या शुभहस्ते सदर रकमेचा चेक रक्कम रुपये २५,००,०००/- ( पंचवीस लक्ष मात्र) रत्नागिरी शाखेला सुपूर्द करण्यात आला. 

सदर प्रसंगी कार्यकारिणी सदस्य श्री श्रीकांत पाटील, श्री सनातन रेडिज, सौ. अनुया बाम, श्री विजय पोकळे, श्री वामन कदम, श्री श्याम मगदूम ज्येष्ठ रंगकर्मी श्री आप्पा रणभिसे उपस्थित होते.

अशा पद्धतीने आणि एवढी मोठी रक्कम नाट्य परिषदेच्या शाखेला मिळण्याची ही इतिहासातील पहिली घटना आहे. सदर रकमेच्या व्याजाचा विनियोग रत्नागिरी शाखेच्या कार्यक्षेत्रातील रंगभूमीला ऊर्जा देण्यासाठी तसेच होतकरू रंगकर्मिना प्रोत्साहन देण्यासाठी केला जाणार आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:33 02-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow