तांत्रिक अडचणींमुळे रत्नागिरी जिल्हा बँकेच्या भरतीपूर्व परीक्षेत गोंधळ; घरडा केंद्रावरील आजची परीक्षाही लांबणीवर

Sep 2, 2024 - 08:58
 0
तांत्रिक अडचणींमुळे रत्नागिरी जिल्हा बँकेच्या भरतीपूर्व परीक्षेत गोंधळ; घरडा केंद्रावरील आजची परीक्षाही लांबणीवर

रत्नागिरी : जिल्हा बँकेच्या ऑनलाईन नोकरभरती प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्हयातील चार परीक्षा केंद्रावर दि. ०१/०९/२०२४ ते ०४/०९/२०२४ या कालावधीत तीन सत्रांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे.

परंतु या चार परीक्षा केंद्रापैकी फक्त घरडा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मु.पो.लवेल, ता. खेड या परीक्षा केंद्रावर नेटवर्क संदर्भात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे दि. ०१/०९/२०२४ व दि. ०२/०९/२०२४ या दोन दिवसामध्ये होणारी ऑनलाईन परीक्षा रद्द करण्यात आली असून घरडा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मु.पो.लवेल, ता. खेड या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा रद्द झालेबाबत त्यांना ई-मेलद्वारे कळविणेत आले आहे तसेच पोर्टलवर प्रसिध्द करणेत आले आहे. सदरची रद्द झालेली परीक्षा अलाहिदा घेण्यात येणार असून त्यासंबंधीची माहिती संबंधित उमेदवारांना परीक्षेच्या तारखेपूर्वी तीन ते चार दिवस आगाऊ मेसेज द्वारे, ई-मेलद्वारे तसेच वेबसाईटद्वारे परीक्षा घेणाऱ्या संबंधित एजन्सीकडून कळविण्यात येणार आहे. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घेऊन बँकेस सहकार्य करावे.

तसेच उर्वरीत इतर तीन केंद्रावरील परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत, याचीही संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:27 02-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow