वांद्रे - मडगाव ट्रेनला खेडमध्ये थांबा देण्याबाबत आ. योगेश कदम यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री यांना पत्र

Sep 2, 2024 - 09:51
 0
वांद्रे - मडगाव ट्रेनला खेडमध्ये थांबा देण्याबाबत आ. योगेश कदम यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री यांना पत्र

खेड : मुंबई वांद्रे येथून थेट मडगाव येथे सुरू करण्यात आलेल्या ट्रेनला खेड येथे थांबा देण्यात आलेला नाही. रत्नागिरी आणि चिपळूण असे दोनच थांबे रत्नागिरी जिल्ह्यात देण्यात आले आहेत. यावरुनच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार योगेश कदम त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना थेट पत्र लिहून खंत व्यक्त केली आहे.

खेड येथे जादा रेल्वे सेवेची मागणी होती. नव्या ट्रेनमुळे ही गरज पूर्ण होईल, अशी आशा अनेकांना होती. अंतिम मंजुरीमध्ये खेड येथे थांबा बगळणे ही बाब निराशाजनक आहे. महत्वाच्या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या संभाव्य फायदाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा स्पष्टपणे या पत्रात नमूद करण्यात असला आहे. हा थांचा आत्ता लागू केल्यास नंतरच्या तारखेला अतिरिक्त थांब्यांची विनंती करण्याची अवघड आणि अनेकदा लांबलचक प्रक्रिया टाळता येईल, असे कदम म्हणाले.

या पत्रानंतर आता केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव हे दखल घेऊन खेड येथे थांबा मंजूर करतात का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. खेड येथे थांबा मंजूर केल्यास मुंबई उपनगरात राहणाऱ्या अनेक प्रवाशांना या रेल्वेमुळे मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. ही रेल्वे सुरू करण्यात आल्याबद्दल धन्यवाद देताना आपल्या या मागणीला योग्य प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा आ. कदम यांनी व्यक्त केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow