क्रॉसिंगसाठी थांबलेल्या राजधानी एक्स्प्रेसमधून ३ लाखांचे २ मोबाईल चोरीला

Sep 2, 2024 - 10:01
 0
क्रॉसिंगसाठी थांबलेल्या राजधानी एक्स्प्रेसमधून ३ लाखांचे २ मोबाईल चोरीला

खेड : कोकण रेल्वे मार्गावरील खेड नजीकच्या अंजनी रेल्वे स्थानकात क्रॉसिंगसाठी थांबलेल्या राजधानी एक्स्प्रेसमधून प्रत्येकी दीड लाख रुपये किमतीचे असे दोन १४ प्रो मॅक्स अँपल कंपनीचे ३ लाख रुपये किमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ जुलै रोजी घडली होती. 

याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुदत्त प्रभाकर शेनोई (रा. गुजरात) यांनी तक्रार दाखल केली आहे. ८ जुलै रोजी ते राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करत असताना मध्यरात्री ३.१५ वाजता गाडी क्रॉसिंगसाठी थांबली असता, अज्ञात चोरट्याने बॅगमधील दोन मोबाईल फोन चोरून नेल्याची त्यांनी तक्रार दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 02-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow