Paralympics 2024 : सांगलीच्या सचिन खिलारीला पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकमध्ये रौप्य पदक
महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील करागणी या छोट्याशा गावातील सचिन सर्जेराव खिलारी ( Sachin Sarjerao Khilari) याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकी कामगिरी केली आहे. पुरुषांच्या गोळाफेक इवेंटमधील F46 प्रकारात त्याने भारतासाठी रौप्य पदक पटकावले .
कॅनडाच्या खेळाडूंनं जिंकल गोल्ड, एवढ्या अंतरावर पडला सचिनचा गोळा!
अंतिम फेरीत सचिन याने १६.३२ मीटर अंतर गोळा फेकून पदकाची आपली दावेदारी भक्कम केली होती. कॅनडाच्या ग्रेगनं १६.३८ मीटर गोळा फेकत सुवर्णाला गवसणी घातली. या दोघांशिवाय क्रोएशियाचा लुका हा १६.२७ मीटर अंतरावर गोळा फेकत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने कांस्य पदक पटकावले.
आधी पॅरा गेम्समधील भालाफेकमध्ये लक आजमावल, हातानंतर खांद्याला पटका बसल्यावर गोळाफेकमध्ये आला
नववीच्या वर्गात शिकत असताना सायकलवरून पडल्यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. गँगरिनमुळे डाव्या हाताच्या कोपराच्या खालील भागाला कायमस्वरुपी अपंगत्व आले होते. पॅरा क्रीडा प्रकारात आधी तो भालाफेक प्रकारात खेळायचा. पण खांद्याला झालेल्या दुखापतीनंतर सांगलीच्या या पठ्ठ्यानं हार न मानता गोळाफेक प्रकारात भाग घेण्याचा निर्णय घेतला. जागतिक स्पर्धेत भारताची मान अभिमानानं उंचावणाऱ्या सचिननं पॅरिस येथील पॅरालिम्पिकमध्येही कमाल करून दाखवली. तो इंजिनिअरिंगमधील पदवीधर आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 04-09-2024
What's Your Reaction?