अजितदादा आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाला गेले, 40 वर्षात असं पाहिलं होतं का.. : देवेंद्र फडणवीस

Sep 6, 2024 - 14:09
 0
अजितदादा आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाला गेले, 40 वर्षात असं पाहिलं होतं का.. : देवेंद्र फडणवीस

मुंबई : अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने कोणतीही चूक केलेली नाही. अजित पवार यांना सोबत घेणे ही काळाची गरज होती. राजकारणात काळाची गरज असताना हाती आलेली संधी सोडायची नसते. अजितदादांबाबत (Ajit Pawar) घेतलेली संधी सेटल व्हायला वेळ लागेल.

पण एका वातावरण स्थिर झाले की ही संधी घेतल्याचा फायदा आम्हाला मिळेल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.  

यावेळी अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. अजितदादांसोबत युती करुन आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची मतं भाजपला (BJP) ट्रान्सफर झाली नाहीत, ही खरी गोष्ट आहे. पण त्यावेळी अजित पवार यांचा पक्ष नवीन होता. त्यांचीच मतं सेटल होणे गरजेचे होते. त्यामुळे लोकसभेला (Loksabha Election 2024) त्यांना त्यांची मतं भाजपला ट्रान्सफर करता आली नाहीत. पण विधानसभा निवडणुकीत तसं घडणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अजितदादा सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाला गेले, त्यांना आमचे सगळे गुण लागतील : देवेंद्र फडणवीस

अजित पवार गुलाबी झाले पण ते भगवे झाले नाहीत, या राजकीय वर्तुळातील चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अजित पवार त्यांच्या सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाला (Siddhivinayak) गेले होते. तुम्ही अजितदादांना 40 वर्षांपासून राजकारणात पाहताय. तु्म्ही अजितदादांना अशा गोष्टी करताना पाहिले होते का? ते आमच्यासोबत राहिले की त्यांना आमचे काही गुण लागणारच ना? तुम्ही काळजी करु नका. त्यांना हळूहळू आमचे सर्व गुण लागतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महायुतीमध्ये चेहऱ्याचा वाद नाही; फडणवीसांचं वक्तव्य

महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन वाद आहे का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, आमच्यात चेहऱ्यावरुन कोणताही वाद नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, त्याअर्थी तेच सरकारचा प्रमुख चेहरा आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 06-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow