रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धेत सौरीश कशेळकर विजेता

Sep 14, 2024 - 14:29
 0
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धेत सौरीश कशेळकर विजेता

रत्नागिरी : रत्नागिरी चेस अकॅडमी आयोजित १९ वर्षांखालील अनिल कानविंदे स्मृती जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरीच्या सौरीश कशेळकरने साडेसहा गुणांसह अपराजित राहून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

चिपळूणच्या साहस नारकरने सहा गुणांसह उपविजेतेपद, ओंकार सावर्डेकर याने साडेपाच गुणांसह तृतीय क्रमांक आणि रत्नागिरीच्या आयुष रायकर याने चौथा क्रमांक पटकावला.

ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने राणी लक्ष्मीबाई सभागृहात पार पडली. स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या संचालक सदस्या सौ. प्रतिभा प्रभुदेसाई आणि ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद प्रभुदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मुलींच्या गटात गुहागरच्या पद्मश्री वैद्यने विजेतेपदाला गवसणी घालत राज्य निवड स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. राजापूरच्या मृणाल कुंभारने उपविजेतेपद तर रत्नागिरीच्या सई प्रभुदेसाई व निधी मुळ्ये यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला. मुलांच्या व मुलींच्या गटातून प्रत्येकी चार खेळाडूंची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्य निवड स्पर्धेसाठी केली गेली.

स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिके अशी : नऊ वर्षांखालील मुले - पारस मुंडेकर, विहंग सावंत. बारा वर्षांखालील मुले - रुमिन वस्ता, राघव पाध्ये. पंधरा वर्षांखालील मुले - आर्यन धुळप, मिहिर काणेकर, बारा वर्षांखालील मुली - आर्या पळसुलेदेसाई, रमा कानविंदे.

पंधरा वर्षांखालील मुली - स्वरा कांबळे, सानवी दामले.

स्पर्धेत विवेक सोहनी यांनी मुख्य पंच म्हणून काम केले. ही स्पर्धा अनिल कानविंदे यांच्या कुटुंबीयांनी प्रायोजित केली होती. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी चैतन्य भिडे, अवधूत पटवर्धन तसेच कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे मोलाचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow