'बर्ड फ्लू'मुळे जगातील पहिला मानवी मृत्यू; WHO ची माहिती

Jun 6, 2024 - 14:20
 0
'बर्ड फ्लू'मुळे जगातील पहिला मानवी मृत्यू; WHO ची माहिती

बर्ड फ्लूमुळे (Bird Flue Death) मेक्सिकोमध्ये (Mexico) पहिला मृत्यू झाला आहे.

हा जगातील पहिला मानवी बळी सांगितला जातोय. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याची माहिती दिली आहे. बर्ड फ्लूच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यानंतर हा पहिल्या मानवी मृत्यूची पुष्टी WHO कडून करण्यात आली आहे. मृत महिला ही मेक्सिकोची रहिवासी होती. WHO ने इशारा दिला आहे की, हा विषाणू जगभरात मोठ्या प्रमाणावर पसरू शकतो आणि येत्या काही वर्षांत आणखी लोकांना संक्रमित करू शकतो. मेक्सिकोमध्ये H5N1 बर्ड फ्लूमुळे मानवी मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.

जागतिक आरोग्य संघटना सतर्क

डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, 23 मे रोजी या रोगाची लागण झाल्याची प्रथम माहिती प्राप्त झाली. या मृत्यूशी संबंधित माहिती आणि रोगामुळे मानवांवर होणारे परिणाम याबद्दल तपासणी सुरू आहे. मात्र, या घटनेनंतर आता जागतिक आरोग्य संघटना सतर्क झाली आहे. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकन आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवेदनानुसार मृत महिलेला ताप, श्वास अटकणे, अतिसार, मळमळ आणि अस्वस्थता यासारखी लक्षणे दिसत होती. या पहिल्या मानवी मृत्यूची जागतिक स्तरावर नोंद झाली आहे, तसेच मेक्सिकोमधील मृत व्यक्तीमध्ये एव्हीयन H5 विषाणू संसर्ग झाल्याची ही पहिली घटना आहे. ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले की, त्यांना यासंबंधित माहिती प्रथम 23 मे रोजी मिळाली होती, ज्यामध्ये मेक्सिकोमधील या घटनेचा उल्लेख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा पोल्ट्री किंवा इतर प्राण्यांशी यापूर्वी कोणताही संपर्क नव्हता. यासंदर्भात कोणताही इतिहास नव्हता. मात्र तिला विविध आजार देखील होते, ज्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली.


बर्ड फ्लूचे विषाणू कोरोना व्हायरसपेक्षा 100 पट अधिक शक्तिशाली?

आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एव्हियन फ्लूची गंभीर लक्षणे दिसण्यापूर्वी 59 वर्षीय महिला ही तीन आठवडे अंथरुणाला खिळलेली होती. तज्ज्ञांनी, यापूर्वी देखील बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली होती, तसेच ते म्हणाले की हे विषाणू कोरोनाव्हायरसपेक्षा 100 पट अधिक शक्तिशाली असू शकतात.

बर्ड फ्लूची प्रमुख लक्षणे

डोळ्यांमध्ये लालसरपणा
ताप
खोकला
घसा खवखवणे
वाहणारे नाक
स्नायू किंवा शरीरात वेदना
डोकेदुखी
थकवा
श्वास घेण्यात अडचण
अतिसार
मळमळ
उलट्या
फीट येणे

बर्ड फ्लूपासून संरक्षण कसे कराल?

वन्य पक्ष्यांशी संपर्क टाळा.
आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची काळजी घ्या.
आपले हात पाण्याने आणि साबणाने धुत राहणे महत्वाचे आहे.
अन्न तयार करण्यापूर्वी वापरलेल्या वस्तू चांगल्या प्रकारे धुवा.
अन्न व्यवस्थित शिजवून खा.
बाहेर पडताना मास्क अवश्य घाला.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 06-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow