डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात आजपासून मोफत शस्त्रक्रिया शिबिर

Sep 21, 2024 - 10:18
 0
डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात आजपासून मोफत शस्त्रक्रिया शिबिर

चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात सायनसवरील सर्व आजारांसाठी दुर्बिणीद्वारे मोफत शस्त्रक्रिया शिबिर २१ व २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. या शिबिराचा लाभ पिवळे, केशरी तसेच पांढऱ्या रेशन कार्डधारकांना सुद्धा घेता येणार आहे. 

या शिबिरामध्ये रुग्णांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या शिबिरांतर्गत ज्या रुग्णांना सतत नाक चोंदणे, नाकाचे हाड वाढणे, अॅलर्जीचा त्रास असणे, सतत सायनसमध्ये सदीं साठणे, नाकातून पाणी येणे, डोळ्यांच्या अश्रू पिशवीतून सतत पाणी वाहणे, श्वास कोंडल्यामुळे रात्रीची झोप मोडणे, घोरणे, नाकातून रक्त येणे असा त्रास असेल त्यांनी वालावलकर रुग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागात दाखवून योग्य निदान करून घ्यावे. या शिबिरातील सर्व शस्त्रक्रिया या दुर्बिणीद्वारे केल्या जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow