गुहागर : पालशेत पुलाच्या अॅप्रोच रोडसाठी १४ जूनपर्यंत एसटी फेऱ्या बंद

Jun 11, 2024 - 15:15
Jun 11, 2024 - 15:20
 0
गुहागर : पालशेत पुलाच्या  अॅप्रोच   रोडसाठी १४ जूनपर्यंत एसटी फेऱ्या बंद

गुहागर : पालशेत येथील नवीन पुलाचे काम सुरू असताना सदर पुलावरून वाहतूक सुरू करण्याकरिता असलेला अप्रो रोड पूर्ण करण्याकरता १० जून ते १४ जून या कालावधीत एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. फेऱ्या बंद करताना केवळ पालशेत ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केल्याचे पुढे आले आहे.

पालशेत येथील बाजार पुलावरून दरवर्षी पाणी वाहून जाते. यामुळे बाजारपेठेमध्ये पाणी भरते व मार्ग बंद होतो. यावर उपाययोजनेकरिता तसेच हा पूल धोकादायक बनला असल्याने या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम सार्व. बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. दरम्यान, हे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुलाच्या दोन्ही बाजूला अॅप्रोच रोड बनविण्यासाठी सार्व. बांधकाम विभागाला चार दिवसांची मुदत आवश्यक आहे. याकरिता या मार्गावरील एसटी फेऱ्या बंद करण्यासाठी गुहागर आगाराकडे मागणी केली आहे. 

गुहागर आगाराने गुहागर-पालशेत आणि उर्वरित फेऱ्या गुहागर, शृंगारतळी, जामसुद, पिंपरमार्गे वळणेश्वर, हेदवी, नरवण, तवसाळ अशा फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत अशी माहिती गुहागर आगारप्रमुख सोनाली कांबळे यांनी दिली आहे. अडूर येथील प्रवाशांना अडूर बोऱ्या फेरी हवी असल्यास याचाही विचार करण्यात येईल असे ही सांगितले.

या पुलाचे काम येत्या चार दिवसांमध्ये पूर्ण करून या पुलावरून वाहतूक पूर्ववत करण्यात येईल व चार दिवसांमध्ये अॅप्रोच रस्ता करण्यात येईल, अशी माहिती सार्व. बांधकाम उपविभाग गुहागर उपअभियंता सलोनी निकम यांनी दिली. यामुळे गुहागर पालशेतमार्गे एकही एसटी जाणार नाही याबाबत संबंधित ग्रा. पं. ना सूचना देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 11/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow