गुहागर : मुंढर आंग्रेवाडीत घरफोडी; १ लाख २१ हजारांचा ऐवज चोरीस

गुहागर : तालुक्यातील मुंढर पूर्व आंग्रेवाडी येथे चोरट्याने केलेल्या घरफोडीत १ लाख २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुहागर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ जुलै ते ५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसंत रामचंद्र आग्रे यांचे मुंढर पूर्व आग्रेवाडी येथे घर आहे. ते सध्या कल्याण मुंबई येथे राहतात. घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील २५ हजार रुपयांचा फ्रीज, २५ हजारांचा टीव्ही, २० हजारांचे वॉशिंग मशीन, ३५ हजारांचा इन्व्हर्टर सेटअप, १० हजारांचा स्टॅबिलायझर, दीड हजारांचा टेबल फॅन, १ हजार रुपयांची शेगडी आणि ३ हजारांचा सिलिंडर असा एकूण १ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादी वसंत आग्रे यांनी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी (ता. ६) सायंकाळी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:05 PM 08/Nov/2024

Shanti 3