रत्नागिरी : नाचणे येथील ‘ओम साई मित्रमंडळ’ भरवणार महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी शिबीर

रत्नागिरी : जनसेवा हिच ईश्वर सेवा,या सेवेचा वसा हाती घेऊन गेली ३० वर्षे त्या दृष्टीने विविध जनहितार्थ सामाजिक उपक्रम राबविणारे ओम साई मित्र मंडळ,नाचणे – साळवी स्टॉप,लिंक रोड, माध्यमिक शिक्षक पतपेढी समोर,रत्नागिरी यांनी “आपली माणसं “*या संकल्पनेतुन आरोग्य तपासणी शिबिराचे रविवार दि. २४/११/२०२४ रोजी रत्नागिरी मधील सुप्रसिद्ध डॉ.विराज आठल्ये तसेच डॉ. दिलीप पाखरे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी येथे जनसेवा बजावणारे मंडळाचे डॉ.ऋत्विक शेंडगे व वेदांग भट हे उपस्थित होते.तसेच मंडळाचे पराग सावंत,अमोल सावंत,गौरांग आगाशे,साईराज मयेकर,आनंद भट, हर्ष सावंत, अभिजित गिरकर, मिलिंद जोशी,शार्दूल मोरे,मंडळाचे अध्यक्ष अनंत आगाशे इ.उपस्थित होते. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून दर महिन्याला भरविण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिराचा अनेक लोकांना लाभ होणार आहे.ओम साई मित्रमंडळाने सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात असून मंडळाने सुरू केलेल्या कार्यावर शुभेच्छांची बरसात होत असुन सर्व स्तरातून मंडळाचे कौतुक करण्यात येत आहे.

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हे आरोग्य तपासणी शिबीर भरविण्यात येणार आहेजास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ओम साई मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 26/Nov/2024

Tata motars punch