दहावी बोर्डात यंदा देखील मुलींचीच बाजी..

May 27, 2024 - 11:17
 0
दहावी बोर्डात यंदा देखील मुलींचीच बाजी..

◼️ मुलींचा निकाल ९७.२१ टक्के तर मुलांचा निकाल ९४.५६ टक्के

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result) जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता दहावीतील लाखो विद्यार्थ्यांचे या निकालाकडे लक्ष लागले होते.

दरम्यान, या निकालात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे.

यंदाही मुलींनीच मारली बाजी

सर्व विभागीय मंडळांतून मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.21 टक्के आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.56 टक्के आहे. मुलींचा निकाल हा मुलांच्या निकालापेक्षा 2.65 टक्क्यांनी जास्त आहे. म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी या परीक्षेत बाजी मारली आहे. एकूण 18 विषयांचा निकाल हा 100 टक्के राहिला आहे.

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आता https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. मिळालेल्या गुणांची प्रिंटही विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर पाहता येईल. साधारण सोळा लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेस नोंदणी केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow