अभिनेते शरद पोंक्षे यांचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

Jun 27, 2024 - 12:13
Jun 27, 2024 - 16:19
 0
अभिनेते शरद पोंक्षे यांचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

मुंबई : बॉलिवूड प्रमाणे मराठी सिनेसृष्टीतही अभिनेत्यांच्या मुलांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. तर काही जण हे पडद्यामागे निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

आता या यादीत आणखी एका कलाकाराचे नाव जोडले जाणार आहे. अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांचा मुलगा स्नेह पोंक्षे (Sneh Ponkshe) आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. शरद पोंक्षे आणि स्नेह पोंक्षे ही वडील-मुलाची जोडगोळी 'बंजारा' या चित्रपटात एकत्र आली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच लाँच करण्यात आला. आयुष्याच्या प्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचा अंदाज फर्स्ट लूकवरून दिसून येत आहे.

मराठी कलाक्षेत्रातील शरद पोंक्षे हे महत्त्वाचे नाव आहे. नाटक, मालिका, चित्रपट या कलेच्या विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर शरद पोंक्षे 'बंजारा'चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे करणार आहे. दिग्दर्शक म्हणून स्नेहचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट आणि मनोरंजनात्मक कलाकृती पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:41 PM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow