T20 World Cup 2024 : अखेर सुपर 8 मधील सर्व संघ ठरले, भारताचे सामने कोणत्या दिवशी, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Jun 17, 2024 - 15:26
Jun 17, 2024 - 15:44
 0
T20 World Cup 2024 : अखेर सुपर 8 मधील सर्व संघ ठरले, भारताचे सामने कोणत्या दिवशी, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

अँटिग्वा : 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील Super 8 गटाचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. इंग्लंडने उशारीने पुनरागमन करताना आणि ऑस्ट्रेलियाच्या कृपेने शेवटच्या क्षणाला सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले. पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका आदी तगडे संघ स्पर्धेबाहेर फेकले गेले, तर अमेरिका हा नवखा संघ सुपर ८ मध्ये तगड्या संघांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताच्या ग्रुप १ मधील चौथा स्पर्धक आज निश्चित झाल्याने सुपर ८ गटाचं संपूर्ण वेळापत्रक समोर आले आहे. 

बांगलादेशने सोमवारी नेपाळवर २१ धावांनी विजय मिळवुन सुपर ८ गटातील आपले स्थान पक्के केले. बांगलादेशच्या १०६ धावांच्या प्रत्युत्तरात नेपाळला ८५ धावाच करता आल्या. बांगलादेश ग्रुप १ मध्ये आता भारत, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना करणार आहे, तर ग्रुप २ मध्ये अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. सुपर ८ मध्ये प्रत्येक संघ ३ सामने खेळतील आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 

१९ जून रोजी अँटिग्वामध्ये अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीने सुपर ८ चा टप्पा सुरू होईल. त्याच दिवशी संध्याकाळी सेंट लुसियामध्ये वेस्ट इंडिजचा सामना इंग्लंडशी होईल. पुढील दिवशी बार्बाडोसमध्ये अपराजित भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने होतील. भारत कॅरिबियनमध्ये प्रथमच या स्पर्धेतील सामना खेळणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया हे संघ २२ जून रोजी सेंट व्हिन्सेंट येथे समोरासमोर येतील तेव्हा गेल्या वर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलच्या आठवणी ताज्या होतील. पण, या लढतीत टीम इंडिया त्याची व्याजासह वसूली करेल, अशी चाहत्यांना इच्छा आहे. 

सुपर 8 च्या लढतींचं वेळापत्रक

18 जून : अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, सकाळी 6. 00 वाजता
१९ जून: अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॉर्थ साउंड, अँटिग्वा
१९ जून: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया
२० जून: अफगाणिस्तान विरुद्ध भारत, ब्रिजटाउन, बार्बाडोस
२० जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, नॉर्थ साउंड, अँटिग्वा
२१ जून: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रोस आइलेट, सेंट लुसिया
२१ जून: अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्रिजटाउन, बार्बाडोस
२२ जून: भारत विरुद्ध बांगलादेश, नॉर्थ साउंड, अँटिग्वा
२२ जून: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट
२३ जून: अमेरिका विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाउन, बार्बाडोस
२३ जून: वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॉर्थ साउंड, अँटिग्वा
२४ जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया
२४ जून: अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट

27 जून : पहिली सेमी फायनल, सकाळी 6.00 वाजता

27 जून: दुसरी सेमी फायनल , रात्री 8.00 वाजता

29 जून : अंतिम सामना , रात्री 8.00 वाजता

सुपर 8 ची दोन गटात विभागणी

ग्रुप स्टेजमधून 20 पैकी 12 संघ स्पर्धेबाहेर गेले तर पुढच्या फेरीत 8 संघांनी प्रवेश केला. आयसीसीनं या आठ संघांची दोन गटात विभागणी केली आहे. भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश या संघांचा एक गट तयार करण्यात आला आहे. तर, दुसऱ्या गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, इंग्लंडचा समावेश आहे. सुपर 8 मधून दोन्ही गटातून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीच्या लढतीमधील विजेत्या संघांमध्ये अंतिम फेरीची लढत होणार आहे.

भारत 17 वर्षानंतर पुन्हा विजेतेपद मिळवणार?

भारतानं 2007 मध्ये पहिल्य टी 20 वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात अंतिम फेरीच्या लढतीत पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद मिळवलं होतं. भारताला त्यानंतर पुन्हा टी 20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नााही. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं चांगली कामगिरी केली आहे. भारतानं ग्रुप स्टेजमध्ये तीन सामन्यात विजय मिळवला होता. आता सुपर 8 मधून सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी भारताकडे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 17-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow