निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडी आयोजित भव्य 'शालेय बॅग वाटप' कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Jun 18, 2024 - 10:47
 0
निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडी आयोजित भव्य 'शालेय बॅग वाटप' कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

रत्नागिरी : गेली आठ ते दहा वर्ष जि.प.आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी शाळेसाठी वह्या वाटप कार्यक्रम दरवर्षी असतोच. दोन वर्षापासून निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडीतर्फे जि.प.आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी आणि जि.प. शाळा तवसाळ बाबरवाडी या दोन्ही शाळेतील व इतर असे मिळून ७५ विद्यार्थांना दि. १६  जून (रविवार) २०२४ रोजी शालेय स्कूल बॅग वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी चांगले मार्गदर्शन केले. तुम्ही निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ (तांबडवाडी) जे काही शालेय उपक्रम राबवता आहात ते खूपच कौतुकास्पद आहे. असेच उपक्रम प्रत्येक गावागावात वाडी वाडीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये झालेच पाहिजे. आणि आपल्या जिल्हा परिषद शाळा चालू राहिल्या पाहिजेत. आता सध्याच्या परिस्थितीत गावाकडील शाळा ह्या ओस पडू लागल्या आहेत.

असेच या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे श्री. परवेझ चिपळूणकर सर (केंद्रप्रमुख), श्री.नंदकुमार बेंद्रे, सौ.प्रियांका सुर्वे मॅडम (सरपंच), श्री.विजय मोहिते (शिक्षण समिती माजी अध्यक्ष), श्री.निलेश सुर्वे, श्री.शितप, श्री.निलेश खामकर सर, श्री.सुनील लाकडे, श्री.जोगळेकर सर (मा. ल.भा. हेदवकर हेदवी हायस्कूल मुख्याध्यापक), श्री.कोकाटे सर, श्री.दत्ताराम जोगळे (समाजसेवक) श्री. चंद्रकांत निवाते, श्री.रमेश कुरटे (शिक्षण समिती अध्यक्ष), सौ.निवाते मॅडम, सौ.येद्रे मॅडम,सौ.नम्रता निवाते(माजी सरपंच) श्री.कृष्णा वाघे , श्री.संदीप जोशी (माजी सरपंच) श्री.शंकर येद्रे, श्री.विजय नाचरे,श्री.दीपक निवाते, श्री.अंकुर मोहिते सर (मुख्याध्यापक तवसाळ तांबडवाडी) तसेच वाडीतील सगळेच ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे फोटो‌ आणि व्हिडिओ छायाचित्रण करणारे Dj श्री सचिन कुळये यांनी केले.

तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य आणि आर्थिक मदत केली त्या सर्वच देणगीदार यांचे सदैव ऋणी आहोत असे निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ (तवसाळ तांबडवाडी) यांच्यातारे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 18-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow