गोवा बनावट दारू विक्रेत्याच्या विरोधात सरकारी यंत्रणा ॲक्शन मोडवर...

Jul 1, 2024 - 10:07
 0
गोवा बनावट दारू विक्रेत्याच्या विरोधात सरकारी यंत्रणा ॲक्शन मोडवर...

राजापूर : राजापूर शहरात किंबहूना राजापूर तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूच्या विक्रेत्यांनी घातलेला हैदोस यामुळे राजापूर शहरात किंबहुना तालुक्यात पोलिस स्थानक आहे की नाही असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजापूर शहर सोबत, नाटे अश्या अनेक तालुक्यातील भागात दाट वस्ती मध्ये हा गोवा बनावटीची चोरीचा धंदा राजरोसपणे अगदी खुशाल,सुरळीतपणे आपली परवानगी असल्याप्रमाणे सुरू आहे. याचे एकमेव कारण आपली उत्पादन शुल्क, पोलिस यंत्रणाचा यांना अभय! अश्या आशयाची बातमी दि.२८ जून २०२४ ला प्रसिद्ध होताच झोपेचे सोंग घेतलेली सरकारी यंत्रणा जागी झाली आहे. हनी गाईड या स्पिरिट च्या दारू सेवनामुळे अगदी चार दिवसांपूर्वी एका  २५ वार्षिय तरुणांचा मृत्यू झाल्याचे समजले होते, आणि अजून काही तरूण हनी गाइड मुळे मृत्यूच्या सापळ्यात अडकले आहेत, असेही समजते.

दि.२८ जून २०२४ रोजी एका मुलाखती मध्ये उत्पादन शुल्क अधिकारी प्रभात सावंत यांनी असे सांगितले होते, की आम्ही कारवाई करतोच पण आम्हला ग्रामसभा ठराव करून गावातील लोकांनी सहकार्य केले पाहिजे. परंतु,दि.२८-०८-२३ आणि दि.१६-१०-२३ चे ग्रामपंचायत नाटे यांनी ठराव करून, त्याबाबत समनधित पोलिस ठाणे नाटे यांना सुद्धा या बाबत पत्र दि.२७-१०-२३ रोजी दिले होते. परंतु, आजतागायत कोणतीही कारवाई उत्पादन शुल्क लांजा आणि पोलीस ठाणे नाटे कडून करण्यात आली नाही. फक्त लोकांवर ढकलून चालणार नाही, सरकारी यंत्रणा ह्या ग्रामस्थांच्या सेवेसाठी असतात. परंतू, याबाबत अस दिसून येते की ह्या यंत्रणा गोवा बनावटीच्या दारू विक्रेत्यांची सेवा करताना दिसतात. सदर गोवा बनावटीचा माल तरळा कडुन येऊन संपूर्ण राजापूर तालुक्यात विखरतो. रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी कोणत्या विभागात ही विक्री होत आहे, याबाबत ची माहिती मागवून कारवाई करणार असलेचे सांगितले होते. त्याचप्रमाणे राजापूर चे पी.आय. चव्हाण, त्याचप्रमाणे नाटे चे केदारी यांनी सुद्धा कारवाई होणार असलेच सांगितले होते. या संपुर्ण विषयाबाबत आता कारवाई बडगा संपूर्ण राजापूर तालुक्यात सुरू झाल्याचे पोलीस यंत्रणेने यावेळी संगीतले आहे. उत्पादन शुल्क विभागाचे उप निरीक्षण यांनी दि.२८-जून-२४ ला आपली यंत्रणा कार्यन्वित करून आपले रेंज अधिकारी संपुर्ण विभागात कारवाई साठी पाठविले असल्याचे सांगितले.

■ गोवा बनावटीच्या दारू विक्रेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे : नाटे पोलीस ठाणे.

■ या विषयनुसरून कारवाई होऊन गुन्हे दाखल झाले आहेत, याची सविस्तर माहिती परिपूर्ण देऊ : राज्य उत्पादन शुल्क उप निरीक्षक लांजा, प्रभात सावंत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow