तळवडे पेडणेकर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी स्वरांगी पांचाळ हिला दहावी परीक्षेत 90 टक्के गुण

May 29, 2024 - 17:48
May 29, 2024 - 17:33
 0
तळवडे पेडणेकर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी स्वरांगी पांचाळ हिला दहावी परीक्षेत 90 टक्के गुण

लांजा : हलाखीची, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, मेहनत, सातत्य या जोरावर तळवडे पेडणेकर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी कुमारी स्वरांगी दिनेश पांचाळ हिने दहावी परीक्षेत 90 टक्के गुण प्राप्त करून सुयश खेचून आणले आहे.

अंतिम दहावी परीक्षेत तिने उंचवलेली कामगिरी कौतुकास्पदच आहे. पूर्व परीक्षेत स्वरांगी पाच गुणवंत विद्यार्थी यादीत शेवटी होती. मात्र अंतिम परीक्षेत बाजी मारली. याच शाळेचा अथर्व अभय पाटोळे आणि स्वरांगी हीने प्रथम क्रमांकाने सुयश प्राप्त केले. स्वरांगी ही आसगे गावची सुकन्या पाचवी इयतेत्त तिने तळवडे  जगन्नाथ पेडणेकर माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला. घरची परिस्थिती हलाखीची! वडील दिनेश यांचा वेल्डिंगचा छोटा व्यवसाय होता, मात्र वडिलांचे आजारामुळे अकाली निधन झाले. एक भाऊ वडिलांच्या निधनानंतर एकाकी जीवन जगत आईने मोल मजुरी करून दोन्ही मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी धावपळ केली. तळवडे जगन्नाथ पेडणेकर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक प्रभाकर सनगरे, विजय पाटोळे यांनी स्वरांगिला मदतीचा हात दिला.

शाळेच्या सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी प्रोसाहान दिले तिने न डगमगता आसगे येथून तळवडे शाळेत ये जा करून दहावी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. जिद्द, मेहनत, चिकाटी जोरावर अभ्यास करून वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी तिने प्रयत्न केले आहे. तिला चित्रकला, कलेची आवड आहे. चुलते पांडुरंग पांचाळ यांचा गणपती बनविणे कारखाना आहे. गणपती बनविणे कामी ती अभ्यास करून मदत करत होती. तिला चित्रकला कलेची आवड असल्याने शोध कला रत्नांचा या उक्रमाअंतर्गत तिची लांजा तालुक्यातून जे जे आर्ट च्या कार्यशाळेत निवड झाली होती. हर्चेकर सर यांनी चित्रकला विषयाचे मार्गदर्शन केले. तिला इंजिनिअर बनायचे आहे. तिच्या या जिद्दी बद्दल, सुयशाचे तळवडे संस्था अध्यक्ष डॉ आनंद पेडणेकर व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री डी. बी. पाटील व सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:02 29-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow