दापोली : आसूद काजरेवाडीवर मानवनिर्मित दरडीचे संकट

Jun 11, 2024 - 13:40
Jun 11, 2024 - 13:42
 0
दापोली : आसूद काजरेवाडीवर मानवनिर्मित दरडीचे संकट

दापोली : तालुक्यातील आसूद काजरेवाडीतील कुटुंब जवळपास आठ वर्षे मानवनिर्मित दरडीच्या छायेत आहेत. दरवर्षी पावसाळा आला की, येथील कुटुंबांचे स्थलांतर करण्यासाठी शासनाची धावाधाव होते. मात्र, आजही येथील कुटुंबांबाबत शासनाने योग्य तोडगा काढला नसल्याने दरडग्रस्त येद्रे आणि धामणे कुटुंबाचा जीव टांगणीला आहे.

२०२३ या पावसाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस संदीप राजपुरे यांनी याकडे शासनाचे लक्ष वेचले होते. त्यानंतर दापोली उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, दापोली तहसीलदार अर्चना बोंबे, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती कुऱ्हाडे येथील सरपंच कल्पेश कडू, तलाठी ऐश्वर्या पाटील, मंडल अधिकारी अधिकारी विनोद जाधव, पंचायत समिती संपर्क अधिकारी दिलीप रूके यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली होती तर यावर वर्षभरात योग्य तोडगा काढू, असे आश्वासन दापोली उपविभागीय अधिकारी अजित घोरबोले यांनी येथील महिलांना दिले होते. या नंतर थोरबोले यांनी विकासक यांचे समवेत दापोली उपविभागीय कार्यालयात बैठक घेऊन योग्य तोडगा काढला जाईल, असे दरडग्रस्त कुटुंबांना सांगितले होते.

दरम्यान, आश्वासनानंतर वर्षाचा कालावधी लोटला तरी यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला यश आल्याचे दिसले नाही तर आसूद आहे. येथील वस्तुस्थिती 'जैसे थे' आहे. दापोली तालुक्यातील आसूद काजरेवाडीत येद्रे आणि धामणे ही चार कुटुंब कित्येक पिढ्या येते रहात आहेत. ही वाडी दापोली-हर्णे या मार्गावरील मुख्य रस्त्याचे लगत डोंगर माथ्यावर वसलेली आहे.

२०१६ या साली येथील डोंगर एका बांधकाम व्यावसायिकाने तीस ते चाळीस फूट उभा कापून पायथ्याशी इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे येथे महाकाय दरड तयार झाली दापोलीतील तत्कालीन तहसीलदार कविता जाधव आणि कल्पना गोडे याचे काळात येथे दोन वेळा ही दरड कोसळली होती. त्या नंतर या ठिकाणी जांभ्या चिऱ्याची भिंत उभी करण्यात आली आहे.

या भिंतीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. तर ही भिंत बांधकाम व्यावसायिक यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन बांधावी अस ठरले होते. मात्र, तेही घोंगड भिजत आहे. त्यामुळे येद्रे आणि धामणे कुटुंबांचा स्थलांतराचा वनवास संपताना दिसत नाही.

आसूद काजरेवाडीतील कुटुंबाची समस्या सुटावी म्हणून मी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे तर हा प्रश्न आपण कायमचा सोडवू, असे आश्वासन शासनाने मागील वर्षी दिले होते. मात्र, तरीही समस्या 'जैसे थे' आहे.
संदीप राजपुरे, राष्ट्रवादी काँग्रेग, राज्य सरचिटणीस

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 11/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow