रत्नागिरी : सैतवडेत साथीच्या रोगांबाबत जनजागृती

Jul 13, 2024 - 11:03
Jul 13, 2024 - 14:05
 0
रत्नागिरी : सैतवडेत साथीच्या रोगांबाबत जनजागृती

रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे येथे डेंगीसह तापाचे रुग्ण आढळून आले होते. त्याची गंभीर दखल घेत रत्नागिरी तालुका आरोग्य विभागाने सैतवडेसह गुंबद परिसरात साथीच्या रोगांबाबत जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते. त्यामध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन प्रबोधन करण्यात आले. पावसाळ्यात सांडपाणी, अस्वच्छता, दूषित पाणी, पाण्यात असणाऱ्या अळ्या यामुळे साथीचे रोग पसरतात. त्याबाबत आरोग्य विभागाने सैतवडे येथे जनजागृती मोहीम हाती घेतली होती. या वेळी हिवताप विस्तार अधिकारी पुजारी, कीटक समारक शेलार, तालुका आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक चेतन शेट्ये, कीटकशात्रज्ञ मेस्त्री, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट झाडे यांच्यासह वाटद प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या डॉ. श्रुती कदम व सर्व आरोग्यकेंद्राचा कर्मचारी वर्ग, सैतवडे आरोग्य उपकेंद्राच्या पावरी तसेच आशासेविका उपस्थित होत्या. वाटद प्राथमिक आरोग्य केद्रांच्यावतीने सैतवडे येथे धूरफवारणीचे औषध देण्यात आले. हिवताप विस्तार अधिकारी पुजारी यांनी आरोग्यविषयक विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow