खेड : लोटेतील एक्सल इंडस्ट्रीजमध्ये वायू गळतीची चौघांना बाधा; दोघांची प्रकृती चिंताजनक
लोटे : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये एक्सेल कंपनीत मंगळवारी रात्री वायू गळत्ती झाली होती. प्रक्रिया सुरू असताना रसायन गळती होऊन त्याचा पावसाच्या पाण्यामध्ये संपर्क झाल्याने तयार झालेला वायू नजीकच्या लोटे चाळकेवाडी व तलारी वाडीमध्ये पसरला होता. त्या मध्ये चार जणांना वायूची बाधा झाली होती. त्या पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परिणामी साळकेवाडी व तलारीवाडी मधील ग्रामस्थ आक्रमक झाले असून स्थलांतराची मागणी लावून धरली आहे.
मंगळवार २३ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास कारखान्यामध्ये रासायनिक प्रक्रिया सुरु असताना रसायनाची गळती होऊन त्या रसायनाचा पावसाच्या पाण्याची संपर्क झाल्यामुळे त्यामधून घातक वायू तयार झाला आणि तो काही मिनिटातच नजीकच्या सारखेवाडी व तलारीवाडीमध्ये पसरला. याचा त्रास वाडीतील चार ग्रामस्थांना झाल्याने त्यांना नजीकच्या घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी दगडू चाळके (७५) व सीताराम कोळे (७२) यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना चिपळूण येथील लाईट केअर रुग्णालयात अधिक उपचारार्थ पाठविण्यात आले.
या घटनेमुळे दोन्ही वाड्यांमधील ग्रामस्थ आक्रमक होऊन कारखान्याच्या गेटवर धडकले. मात्र कारखाना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती न दिल्यामुळे ग्रामस्थ अधिकच संपात अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कारखाना व्यवस्थापन ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक चाळकेवाडी येथील साई मंदिरात घेण्याचे त्या बैठकीत ग्रामस्थांनी आमच्या संपूर्ण वाडीचे स्थलांतर करून हा त्रास कायमचा मिटवा, अशी मागणी लावून धरण्यात आली. यावर कारखाना व्यवस्थापनाने स्थलांतर आणि पुनर्वसन करण्यासाठी असणाऱ्या प्रक्रियेमध्ये सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खिडकी पोलीस निरीक्षक नितीन भोयर लोटेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. लोटेचे उपसरपंच श्री मनोहर कालेकर शेळकेवाडी अध्यक्ष श्री रोहित चाळके पोलीस पाटील श्री. हळदे यांच्यासह शेकडा ग्रामस्थ एक्सेल कंपनीचे व्यवस्थापक आनंद पाटणकर, भरत बजागे इत्यादी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 25/Jul/2024
What's Your Reaction?