खेडच्या आयुष जाधवला राज्सस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

Jul 25, 2024 - 11:24
Jul 25, 2024 - 15:48
 0
खेडच्या आयुष जाधवला राज्सस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

खेड : चंद्रपूर येथे पार पडलेल्या राज्सस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडिअम स्कूलच्या आयुष जाधव याने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले.

ही स्पर्धा ७वी महाराष्ट्र राज्य कॅडेट क्यारोगी व पुमसे चॅम्पियनशिप २०२४-२५ तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वांदो असोसिएशन चंद्रपूर यांच्यामार्फत चंद्रपूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हयातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आयुष जाधव याने रत्नागिरी जिल्हयाचे प्रतिनिधित्व केले. त्याने जिल्हा  तायक्वांदो संघामधून ५५ किलो वजनी गटामध्ये बीड, वर्धा, लातूर, कोल्हापूर या जिल्हयातील खेळाडूंवर मात करत सुवर्ण पदक पटकावले. आयुष जाधव हा रोटरी स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत असून त्याला लहानपणापासून विशेष आवड आहे. त्याने यापूर्वीही तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.

शाळेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ, भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुवर्ण पदक विजेता आयुष जाधव याचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:51 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow