चिपळूण : शिरगाव-अलोरेत तोडलेल्या जुन्या पुलाचे लोखंड नदीपात्रातच
चिपळूण : शिरगाव-अलोरे नवीन पूल उभारणीवेळी जुना पूल तोडण्यात आला आहे. मात्र, त्याच्या शिगा व अन्य लोखंडी साहित्य नदीपात्रात पडून आहे. मुसळधार पावसात पुराच्या पाण्याने काही साहित्य वाहून जात असल्याची तक्रार सूरज शिंदे यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिरगांव-अलोरेला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल तोडून तेथे नव्या पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले. मात्र, ज्यावेळी जुना पूल तोडण्यात आला. त्याच्या लोखंडी शिगा व अन्य साहित्य अजूनही नदीपात्रात आहेत. सध्याच्या पावसाळ्यातील पूर परिस्थितीमुळे या लोखंडी शिगा वाहून जात आहेत. तसेच त्याची चोरीही खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या लोखंडी शिगा व अन्य साहित्याचा लिलाव केल्यास शासनाच्या महसुलात भर पडेल व भविष्यात होणारे नुकसान टाळता येईल असेही सूरज शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 30/Jul/2024
What's Your Reaction?