मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकरांची राजकोट किल्ल्याला भेट

Sep 2, 2024 - 10:11
 0
मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकरांची राजकोट किल्ल्याला भेट

खेड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नौदल सेनेच्यावतीने मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता; परंतु काही दिवसांपूर्वी महाराजांचा हा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली. याची दखल घेत शिवप्रेमी आणि मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी याठिकाणी भेट घेऊन छत्रपतींसमोर नतमस्तक होऊन महाराज आम्हाला माफ करा, अशी विनवणी केली.

यावेळी खेडेकर म्हणाले, महाराजांनी दिलेली शिकवण आम्ही पाळू शकलो नाही याची आज खंत वाटते. ३५० वर्षांपूर्वी महाराजांनी उभारलेले गडकिल्ले आजही दिमाखात उभे आहेत; परंतु आज आपण महाराजांचे उभे केलेले पुतळेसुद्धा सांभाळू शकत नाही, याची खंत मनाला लागून राहिली आहे. भविष्यात याठिकाणी कोकणच्यावतीने आम्ही एक भव्य असा पुतळा उभारू, असे सांगितले. त्यानंतर सर्व शिष्टमंडळाने तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांची भेट घेतली.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, अॅड. अनिल केसरकर, महिला जिल्हाध्यक्षा मोनिका फर्नांडिस, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर, सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, मिलिंद सावंत, शांताराम सादये, खेड तालुकाध्यक्ष नीलेश बामणे, संजय आखाडे (कामगार चिटणीस), प्रदीप भोसले, सोहम पाथरे, पास्कोल रॉद्रीक्स, अमित इब्रामपूरकर, सागर जाधव, विशाल ओटवणेकर, राजू कासकर, विल्सन गिरकर यांसह अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow