Breaking : चिपळूणात वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाड; दोन पीडित महिलांची सुटका, एक संशयित आरोपी ताब्यात

Jun 29, 2024 - 13:37
Jun 29, 2024 - 13:38
 0
Breaking : चिपळूणात वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाड; दोन पीडित महिलांची सुटका, एक संशयित आरोपी ताब्यात

चिपळूण : शहरातील मार्कंडी भागात शालोम हॉटेलच्या मागील गल्लीत एका इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर सुरू असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री उध्वस्त केला. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

येथे दोन एजंट होते. यापैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले असून एकजण फरार झाला. महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना माहिती मिळाल्यानुसार, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक राजेंद्र कुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व सहकारी सदर ठिकाणी गेले दोन दिवस पाळत ठेऊन होते. पोलीस कर्मचारी व गोपनीय विभागाच्या पथकाने शुक्रवारी संयुक्त कारवाई केली. यामध्ये 27 व 30 वर्षे वयाच्या दोन पीडित महिला व एक पुरुष एका सदनिकेत सापडले. पोलिसांनी त्यांना व एका एजंटला ताब्यात घेतले, तर एक एजंट पळून जाण्यात यशस्वी झाला. येथे गेले चार महिने वेषा व्यवसाय चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सर्वांना पोलीस स्थानकात आणून चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव, हवालदार वृशाल शेटकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कदम, राहुल दराडे, आवळे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. शहरातील काही हॉटेल व लॉजवर असे चोरटे व्यवहार होत असून त्यांचेही धाबे दणाणले आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 29-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow