चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानक प्रवेशद्वारासमोरील वाहन हटवले

Sep 21, 2024 - 11:25
 0
चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानक प्रवेशद्वारासमोरील वाहन हटवले

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वार व अपंगांसाठी असलेल्या रॅम्पसमोरच येथील अधिकाऱ्यांनी वाहन पार्किंग करून अडथळा निर्माण केला होता. या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कोकण रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे. त्यामुळे आता प्रवेशद्वार मोकळा श्वास घेत आहे.

सावर्डे रेल्वे स्थानक हे चिपळूण तालुक्यातील महत्त्वाचे स्थानक समजले जाते. मात्र या ठिकाणी अपंगांसाठी असलेल्या रॅम्पला अडथळा होईल अशाप्रकारे अधिकाऱ्यांनी वाहने पार्किंग करण्यास सुरुवात केली. मुख्य प्रवेशद्वारासमोरच वाहने पार्किंगचा प्रकार सुरू होता. या संदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच यानंतर वरिष्ठ पातळीवरून येथील संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली. त्यामुळे आता या ठिकाणी गाडी पार्किंग करण्यात येत नसल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकात जाण्यासाठी सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow