पावसमधील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी
पावस : पावस परिसरामध्ये चोरट्यांनी चोरीचे सत्र सुरू केल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. गणेशगुळेतील गणपती मंदिरातील चोरीनंतर निरूळ-लांजा रस्त्यावरील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी मेर्वी येथील सुतार यांच्या घरामधील ४५ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी गणेशगुळे येथील गणेश मंदिरातील दानपेटी दोन चोरट्यांनी फोडली. याचा तपास सुरू असतानाच निरूळ ते लांजा मार्गावर मोबाईल टॉवर आहे. त्यामध्ये असलेल्या चार्जिंगच्या वीस बॅटऱ्या चोरट्याने पळवून नेल्या. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. या गोष्टीचाही उलगडला लवकरच होईल, असे पूर्णगड सागरी पोलिसांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 13-06-2024
What's Your Reaction?