कोकणातील हज यात्रेकरू सुखरूप असल्याची माहिती

Jun 20, 2024 - 11:15
 0
कोकणातील हज यात्रेकरू सुखरूप असल्याची माहिती

 चिपळूण : जगभरातून हज यात्रेसाठी मक्का येथे मुस्लिम बांधव जातात. यावर्षी देखील लाखो भाविक मक्का येथे गेले आहेत. मात्र, तापमान वाढीमुळे शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. 

या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातून गेलेल्या मुस्लिम बांधवांबाबत भीती व्यक्त होत आहे. मात्र, कोकणातून गेलेल्या यात्रेकरूंपैकी या उष्णतेचा कुणाला फारसा त्रास झालेला नाही व सर्व सुखरूप असल्याचे चिपळूणचे माजी नगरसेवक बरकत वांगडे यांनी सांगितले.

हज यात्रेसाठी गेलेल्या लोकांना तापमानवाढीचा मोठा त्रास होत आहे. ५० अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. मात्र, यामध्ये भारतीयांचा सहभाग नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भारतीय लोकांना ४५ किंवा त्यापेक्षा अधिक तापमानामध्ये राहाण्याची सवय आहे. यावर्षी दिल्लीमध्ये ५० अंश सेल्सीअस तापमान होते. भारत हा उष्ण कटिबंधातील देश आहे. त्यामुळे भारतीय लोकांना वाढत्या तापमानाची सवय असून देशातील लोकांचे शरीर या उच्च तापमानवाढीशी जुळवून घेऊ शकते. मात्र, अन्य देशातील नागरिकांना किंवा समशितोष्ण आणि थंड प्रदेशातील देशातील नागरिकांना वाढत्या तापमानाची सवय नसते. त्यामुळे ५० अंश सेल्सीअस तापमानामध्ये शेकडो लोकांचा बळी जात आहे. मात्र, यामध्ये भारतीय लोकांचा सहभाग नाही. ही घटना दुःखदायक आहे. कोकणातून मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी गेले आहेत. एकट्या चिपळूण तालुक्यातून १६० हून मुस्लीम धर्मीय या यात्रेसाठी गेले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

चिपळूणचे माजी नगरसेवक बरकत वांगडे हे देखील हज यात्रेसाठी आपल्या पत्नीसह गेले आहेत. दि. २६ मे रोजी ते हज यात्रेसाठी रवाना झाले. त्यांना या तापमानवाढीचा फारसा त्रास जाणवलेला नाही. दि. ३ जुलै रोजी ते भारतात दाखल होणार आहेत. वाढत्या तापमानामध्ये आम्ही सर्व ती काळजी घेत आहोत. कोकणी मुस्लीम बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले आहेत. मात्र, कोणाला फारसा त्रास जाणवला नाही, असे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 20-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow