लांजा : वेरवलीत व्यसनमुक्तीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Jun 29, 2024 - 10:22
Jun 29, 2024 - 15:27
 0
लांजा : वेरवलीत व्यसनमुक्तीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लांजा : वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय तु. पु. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय व का. रा. कोळवणकर या महा ट्रेनिंगस्कूलमध्ये व्यसनमुक्ती मार्गदर्शन नुकतेच पार पडले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे सचिव संतोष पडवणकर उपस्थित होते.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल रेडीज व शालेय समितीचे सदस्य सुरेश चव्हाण उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक संतोष पडवणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसनाचे प्रकार आणि व्यसनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, मुलांनी व्यसनाकडे वळू नये, एखादे व्यसन जडल्यास काय होते, त्याचे परिणाम अशा विविध मुद्द्यांसंदर्भात केले. मार्गदर्शन धूम्रपान आणि त्यामुळे आपल्या व इतरांच्या आरोग्यावर होणारे परिणाम हानिकारक आहेत. कर्करोगामुळे आज अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे आपण व्यसनापासून दूर राहिले पाहिजे, असे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. संतोष पडवणकर यांचे आभार शिवाजी बांगर यांनी व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:51 PM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow