लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षपदी लायन गणेश धुरी यांची बिनविरोध निवड

Jun 29, 2024 - 17:09
Jun 29, 2024 - 17:17
 0
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षपदी लायन गणेश धुरी यांची बिनविरोध निवड

◼️ सचिव पदी लायन विश्वास ढोकळे व खजिनदार म्हणून लायन अमेय विरकर यांची निवड 

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या नियमावलीनुसार सन 2024- 2025 च्या लायन्स क्लब रत्नागिरीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावर्षीच्या अध्यक्षपदाची धुरा लायन्स श्री. गणेश धुरी तर सचिव पदी लायन श्री.विश्वास ढोकळे व लायन्स श्री.अमेय विरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

लायन गणेश धुरी हे प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आहेत, तर लायन विश्वास ढोकळे यांची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे तर श्री.अमेय वीरकर हे ज्वेलर्स आहेत. त्याच बरोबर लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून निवड करण्यात आली.

IPP म्हणून MJF ला. शिल्पा पानवलकर, प्रथम अध्यक्ष लायन दीप्ती फडके, द्वितीय अध्यक्ष MJF लायन डॉक्टर शिवानी पानवलकर, तृतीय अध्यक्ष ला. संजय पटवर्धन असोसिएट सेक्रेटरी लायन शरद नागवेकर, असोसिएट खजिनदार लायन सुमित ओसवाल, टेमर साठी साक्षी धुरी, टेल ट्विस्टरला मनोज सावंत, PRO लायन महेंद्र मांडवकर, गॅट चेअरमन लायन श्रेया केळकर, जीएसटी चेअरमन MJF ओंकार फडके, जीएसटी चेअरमन MJF दत्तप्रसाद कुलकर्णी, जीएसटी चेअरमन MJF एडवोकेट शबाना वस्ता, क्लब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह MJF लायन पराग पानवलकर, LCIF चेअरमन MJF लाइन्स सुप्रिया बेडेकर, बुलेटीन एडिटर MJF लायन संतोष बेडेकर, आयटी चेअरमन लायन अस्लम वस्ता ,लायन क्विस्ट चेअरमन लायन प्रवीण जैन, मार्केटिंग अँड कम्युनिकेशन पदी लायन संकेत नवले, क्लब एक्सटेन्शन चेअरमन MJF लायन सुनील देसाई, यांची निवड करण्यात आली.

तसेच लायन्स क्लब रत्नागिरीच्या डायरेक्टर पदी MJF डॉक्टर रमेश चव्हाण, MJF लायन सीए हेरंब पटवर्धन ,MJF सुधीर वणजू, लायन सी ए बिपीन शहा, MJF लायन उत्तमचंद ओसवाल, MJF लायन डॉक्टर भोळे, PMJ लायन प्रमोद खेडेकर, MJF लायन यश राणे, MJF लायन दीपक साळवी यांची निवड करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:38 29-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow