अंबानींच्या लग्नात मराठमोळा गायक संजू राठोडची एन्ट्री, 'गुलाबी साडी' गाण्यावर थिरकलं वऱ्हाड

Jul 15, 2024 - 12:34
Jul 15, 2024 - 15:35
 0
अंबानींच्या लग्नात मराठमोळा गायक संजू राठोडची एन्ट्री, 'गुलाबी साडी' गाण्यावर थिरकलं वऱ्हाड

'गुलाबी साडी' गाणं खूप गाजलं. संजू राठोडने गायलेलं 'गुलाबी साडी' गाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडलं. या गाण्यावर खूप रील्स व्हायरल झाले. इतकंच नव्हे गायक संजू राठोडला या गाण्याच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्धी मिळाली.

केवळ बॉलिवूड नाही तर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनाही 'गुलाबी साडी'ची भुरळ पडली. संजू राठोडसाठी एक खास गोष्ट अशी की, नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात 'गुलाबी साडी' गाऊन संजू राठोडने वरातीत सर्वांना थिरकायला भाग पाडलं.

'गुलाबी साडी' गाण्यावर वऱ्हाड थिरकलं

अंबानींच्या लग्नातले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाला जगभरातले सेलिब्रिटी उपस्थित होते. भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायकांनी या लग्नात त्यांचं गाणं सादर केलं. या सर्व गायकांच्या मांदियाळीत मराठमोळा गायक संजू राठोडचीही एन्ट्री झाली. संजूने गायलेल्या 'गुलाबी साडी' गाण्यावर अंबानींचं वऱ्हाड मंचावर येऊन नाचताना दिसलं. 'गुलाबी साडी' गाण्यावर सर्वांनीच जोरदार डान्स केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 15-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow