खेर्डीतील गांजा प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अद्याप अपयश

Jun 6, 2024 - 09:44
Jun 6, 2024 - 09:48
 0
खेर्डीतील गांजा प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अद्याप अपयश

चिपळूण : खेर्डी येथे गांजा विक्रेता सापडल्यानंतर सावर्डे येथून गांजा पुरवठा करणाऱ्या संशयित मिनाक्षी जयस्वाल हिच्याकडून सुमारे सहा किलो गांजा जप्त केला; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात तिने हा गांजा कोठून आणला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

संबंधित महिलेचा मोबाईल व अन्य साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आलेले नाही. सावर्डे खोतवाडी येथील रहिवासी असलेली मिनाक्षी जयस्वाल हिच्या घरातून १ लाख १८ हजार १६० रुपये किमतीचा तब्बल ५ किलो ९०८ ग्रॅम वजनाचा गांजा सावर्डे पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर जयस्वाल हिला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत आणखी दोन दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी तिचा मोबाईल व अन्य साहित्य जप्त केले असून, त्या आधारे तपास केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 06/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow