रत्नागिरी : हळवं भात पीक कापणी योग्य

Sep 20, 2024 - 10:01
Sep 20, 2024 - 10:04
 0
रत्नागिरी : हळवं भात पीक कापणी योग्य

संगमेश्वर : अनंत चतुर्दशीला उघडीप घेतलेला पाऊस गुरुवारीही (ता. १९) गायब झाला आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता वाढली असून, कडकडीत उन्हामुळे नागरिकांना ऑक्टोबर हिट जाणवत आहे. पावसाने उघडीप घेतली असून पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तापमान वाढल्यामुळे भात पिक करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कापणी योग्य हळवी कमी कालावधी होणारी भातशेती पुढील आठवड्यात पडणाऱ्या पावसाच्या तड्याख्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पिक पाहणी ऑनलाईन अहवालानुसार, यंदा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील सुमारे ३० टक्के क्षेत्रावर हळवी बियाण्यांची लागवड करण्यात आली आहे. ही विपाणी १० ते १०० दिवसांत तयार होतात. यंदा जून महिन्यात मोसमी पाऊस वेळेवर दाखल झाला असला तरीही पुढे काही काळ पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पेरणी पाच ते सहा दिवस उशिराने झाल्या, त्याचा परिणाम भातलावण्यांवर झाला, त्यामुळे हळवी बियाण्यांची तशी थोडी उशिरानेच लागवड झाली आहे; परंतु जुलै, ऑगस्ट या कालावधीत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर ओसरला असला तरीही अधुनमधून पडत होत्या; मात्र अनंत चतुर्दशीपासून पावसाने विश्रांची घेतली आहे. ही बियाण्यांची तशी कापणी झालेली आहे. शेतकरी पावसाच्या विश्रांतीकडे लक्ष ठेवून आहेत; मात्र भात शेती कापणी योग्य झाली असली तरीही पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्तत आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे उत्पादन अधिक येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रत्नागिरी परिसरात आज २९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुपारी १२ वाजता ३० अंश सेल्सिअसवर गेले. जिल्ह्यात आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १.०३ मि.मी. नोंद झाली आहे.

शेतक-यांनी पावसाचा अंदाज घेऊन कापणी करावी, कापलेले पाठ सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे त्यांचे भात पिक कापणीनंतर शेतात भिजले, तर ७२ तासांच्या आत तत्काळ विमा कंपनी व कृषी विभागाशी संपर्क साधावा जेणेकरून तत्काळ कार्यवाही करता येईल. विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow