दत्तात्रय साळी यांना 'ऊर्जाशिरोमणी' पुरस्कार

Jun 11, 2024 - 11:53
 0
दत्तात्रय साळी यांना 'ऊर्जाशिरोमणी' पुरस्कार

रत्नागिरी : महावितरणच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त वार्षिक ऊर्जा पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्गतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावर्षीचा 'ऊर्जाशिरोमणी' पुरस्कार रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांना देण्यात आला.

रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात वर्धापन दिन कार्यक्रम झाला. यावेळी अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर (रत्नागिरी), विनोद पाटील (सिंधुदुर्ग), अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) कल्पना पाटील, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता परेश भागवत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध पुरस्काराने कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले. अधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन ऊर्जा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अप्पासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow