पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन

Jul 18, 2024 - 15:30
 0
पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन

लिबाग : रायगडसाठी एक आनंदाची बातमी असून पेणच्या गणपतीं मुर्तीं भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे पेणसह जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती भवनात आयोजित कार्यक्रमात भौगोलिक मानांकन पेणच्या गणपती व्यवसायिकांना बहाल केले आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींना आता स्वतची ओळख निर्माण झाली आहे.

पेण हे गणरायाचे माहेर घर म्हणून प्रसिद्ध आहे. पेणच्या गणपतींना देशासह जगभरातून मोठी मागणी असते. अनेक कुटुंब गणेश मूर्ती बनविण्याच्या व्यवसायात पिढ्यानपिढ्या काम करीत आहेत. वर्षभर गणपती कारखान्यात गणेश मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या हाताला रोजगार निर्मिती झाली आहे. या व्यवसायातून पेण तालुक्यात करोडो ची उलाढाल दरवर्षी होत असते.

पेणचे गणपती हे प्रसिद्ध असल्याने काहीजण पेणच्या नावाने गणेश मूर्ती विक्री व्यवसाय करून ग्राहकांची फसवणूक करीत असतात. त्यामुळे पेणच्या गणराय व्यवसायिक यांना फटका बसत होता. यासाठी गणपती व्यवसायिक यांनी दीड वर्षापूर्वी पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याच्या या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने पेणच्या गणपतीला भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र दिले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती भवनात एका कार्यक्रमात प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना आता स्वतः ची ओळख निर्माण झाली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:59 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow