'नवरत्न तेल, बोरोप्लस क्रीम ही सौंदर्यप्रसाधने नसून औषधे'; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Jul 18, 2024 - 15:20
 0
'नवरत्न तेल, बोरोप्लस क्रीम ही सौंदर्यप्रसाधने नसून औषधे'; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली : तेलंगणा उच्च न्यायालयाने नुकतेच नवरत्न तेल, गोल्ड टर्मेरिक आयुर्वेदिक क्रीम, बोरोप्लस अँटीसेप्टिक क्रीम, बोरोप्लस प्रिकली हीट पावडर आणि सोनाचांदी च्यवनप्राश याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.

या सगळ्या गोष्टी सौंदर्यप्रसाधने नव्हे तर ड्रग्ज (औषधे) असल्याचे तेलंगणाउच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की हिमानी नवरत्न तेल, बोरोप्लस अँटिसेप्टिक क्रीम सारखई सहा उत्पादने औषधांच्या श्रेणीत मोडतात. उच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाने ही सगळी उत्पादने औषधे असल्याचे स्पष्ट केले आणि ते जीएसटीच्या कक्षेत येत असल्याचे म्हटलं.

न्यायाधिश सॅम कोशे आणि न्यायाधिश एन. तुकारामजी यांच्या खंडपीठासमोर हिमानी नवरत्न तेल, बोरोप्लस अँटी सेप्टीक क्रिम, बोरोप्लस प्रिंकली हीट पावडर, हिमानी निरोगी दंत मंजन लाल, सोना चांदी च्यवनप्राश ही उत्पादने सौंदर्यप्रसादने आहेत की औषधे यासंदर्भात सुनावणी पार पडली. जीएसटी लागू होण्यापूर्वीच निर्माण झालेला २० वर्षे जुना वाद सोडवत खंडपीठाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला.

नेमकं प्रकरण काय?

१९९७ पासून, हिमानी लिमिटेड आणि इमामी लिमिटेड आणि तत्कालीन आंध्र प्रदेश विक्रीकर विभाग यांच्यातील भागीदारी असलेल्या कंपन्यांमधील हा मुद्दा वादात होता. विक्रीकर विभागाने त्यांना सौंदर्यप्रसाधने म्हणून वर्गीकृत केले होते. तत्कालीन विक्रीकर न्यायाधिकरणासमोर (एसटीएटी) याला आव्हान देण्यात आले असता, अँटीसेप्टिक क्रीम, प्रिकली हीट पावडर आणि च्यवनप्राश ही औषधे आणि इतर दोन वस्तू सौंदर्यप्रसाधने असल्याचे हिमानी कंपनीने म्हटलं. सेल्स टॅक्स अपिलेट ट्रेब्युलंटच्या निष्कर्षांना या उत्पादनांच्या कंपन्यांनी २००४ मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दुसरीकडे विक्रीकर विभागानेसुद्धा काही उत्पादनांना औषधे म्हणून आव्हान दिले होते.

हे प्रकरण न्यायलयात असताना जीएसटी कायदा लागू झाला. त्यामुळे जर ही उत्पादने सौंदर्यप्रसाधने म्हणून वर्गीकृत केली तर त्यावर २० टक्के दराने जीएसटी लागू होईल, असे एसटीएटीने म्हटलं. तर ही उत्पादने औषधे नसल्याचा दावा करत त्यावर १० टक्के जीएसटी आकारला जावा असं हिमानीने म्हटलेलं होतं. याबाबत निर्णय देताना खंडपीठाने आयुर्वेदिक कंपन्यांसारख्या उत्पादनांची औषधी रचना आणि कंपन्यांची विक्री करण्याची पद्धत लक्षात घेऊन ते सौंदर्यप्रसाधने आहेत की औषधे हे ठरवता येईल, असे म्हटले आहे. उत्पादनांना औषधे न मानता सौंदर्यप्रसाधने समजावीत, असा युक्तिवाद करून विक्रीकर विभाग आपला युक्तिवाद टिकवून ठेवण्यात अपयशी ठरल्याचेही खंडपीठाने म्हटलं.

न्यायालयाने काय म्हटलं?

दोन्ही बाजू ऐकून घेत, उत्पादनांचे गुणधर्म पडताळून पाहिल्याचे खंडपीठाने म्हटलं. "हिमानी सोना चांदी च्यवनप्राश हे ५२ वेगवेगल्या वनस्पती आणि मिनरल्सपासून बनवलं जाते ज्यामध्ये सोनं, चांदी, केशरचा समावेश असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. मात्र अर्जदारांनी ड्रग्ज आणि कॉस्मेटिक कायदा १९४० अंतर्गत परवाना घेतला आहे. या कायद्यानुसारच एसटीएटीने या उत्पादनांना सौंदर्यप्रसाधने आणि औषध प्रकारामध्ये विभाजित करुन त्याला औषध हा दर्जा दिला. औषध म्हणजे ज्याचा वापर अंतर्गत किंवा बाह्य अवयवांवर केला जातो. ज्याच्या मदतीने रोग किंवा विकारांचे निदान करणे, उपचार करणे, त्याचा प्रभाव कमी करणे किंवा त्याला प्रतिबंध करणे यासारख्या गोष्टी अपेक्षित असतात," असं म्हणत कोर्टाने यासंदर्भात निकाल दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:38 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow