Breaking : संगमेश्वर बाजारपेठेत लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक

Jun 15, 2024 - 09:44
Jun 15, 2024 - 16:10
 0
Breaking : संगमेश्वर बाजारपेठेत लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक

संगमेश्वर : संगमेश्वर बाजारपेठेत आज साडेपाचच्या सुमारास दोन दुकाने जळून खाक झाली आहेत.

सविस्तर वृत्त असे की, संगमेश्वर येथील बाजारपेठेत असलेल्या प्रशांत बेंडके यांच्या किराणा मालाच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागली. याच दुकानाच्या बाजूला असलेल्या शक्ती ट्रेडर्स दुकानालही आगीने वेढले. बघता बघता दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. ज्वाळांनी परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. दुकानांना आग लागल्याचे कळताच व्यापाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले. पहाटेच्या सुमारास लागलेली आग जवळपास दोन तासांहून अधिक काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. बघता बघता ही आग तेथे असलेल्या दवाखन्यापर्यात पोहोचली. दवाखान्यालाही या आगीचा फटका बसला. संगमेश्वर मध्ये अग्निशमन बंब नसल्याने शेवटी देवरूख नगर पंचायतीचा बंब मागवण्यात आला. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तोपर्यंत दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली होती. किराणा मालाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तसेच ट्रेडर्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow