रत्नागिरी : जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 'मिक्स सिल सरफेस ट्रीटमेंट'

Jul 18, 2024 - 17:16
Jul 18, 2024 - 17:24
 0
रत्नागिरी : जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 'मिक्स सिल सरफेस ट्रीटमेंट'

रत्नागिरी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधेअंतर्गत रस्त्यांची कामे केली जातात; परंतु ते रस्ते वारंवार खराब होत आहेत. खेड, दापोली भागात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रस्ते खराब होत असल्याचे कारण पुढे आले. रस्ते टिकवण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेत वापरावी जाणारी एमएसएस (मिक्स सिल सरफेस) ट्रीटमेंट जिल्ह्यात होणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत वापरावी, अशी मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.

समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह सभागृहाने याला एकमताने मंजुरी दिली. केंद्र शासनाकडे यांचा आपण पाठपुरावा करू, असेही आश्वासनही तटकरे यांनी सभागृहाला दिले. नियोजन समितीच्या बैठकीत खासदार तटकरे यांनी जिल्ह्यातील खेड, दापोली, तालुक्यातील रस्ते वारंवार खराब होत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून हे रस्ते का खराब होतात, याची कारणे शोधण्याची मागणी तटकरे यांनी केली होती. त्यानुसार या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मजबूत धरला. त्यांनी सभागृहापुढे आपली भावना मांडली तेव्हा या भागात सुमारे साडेतीन ते चार हजार मिमी होणऱ्या पावसामुळे रस्ते वाहून जात आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून २०२७- २४ ला ११० किमीचे रस्ते करण्यात आले. सुमारेकोटीचे आहेत. १० रस्ते खराब झाले आहे. पावसातून ते वाहून जाण्याची भीती असल्याने त्याचा एक लेयर शिल्लक ठेवला आहे.

रस्ते वाहून जाऊ नयेत यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेत वापरली जाणारी एमएसएस (मिरक सिल सरफेस) ट्रीटमेंट जिल्ह्यात होणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत वापरावी, अशी मागणी केली होती. त्याला सभागृहाने मंजुरी दिली आहे. भविष्यात या ट्रीटमेटचा वापर करण्याची परवानगी केंद्र शासनाने दिल्यास जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे दर्जेदार रस्ते होतीत - सुनील तटकरे, खासदार


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:48 PM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow