Asia Cup 2024, IND vs PAK : शुक्रवारी भारत वि. पाकिस्तान आमनेसामने

Jul 18, 2024 - 16:31
 0
Asia Cup 2024, IND vs PAK : शुक्रवारी भारत वि. पाकिस्तान आमनेसामने

 महिलांच्या आशिया चषकात शुक्रवारी १९ जुलै रोजी भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. महिलांच्या आशिया चषकाची स्पर्धा यंदा श्रीलंकेच्या धरतीवर होत आहे.

श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व पुन्हा एकदा हरमनप्रीत कौरकडे असेल. तर स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी कायम आहे. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेतील सर्व सामने चाहत्यांना मोफत पाहता येणार आहेत. भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानची कर्णधार निदा दारने विजयाचा विश्वास व्यक्त केला.

पाकिस्तानची कर्णधार निदा दार म्हणाली की, संघाची चांगली तयारी झाल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतासारख्या तगड्या संघाला पराभूत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. गतविजेत्या भारतासोबत सलामीचा सामना होत आहे. नक्कीच आव्हान मोठे आहे पण आम्ही विजय प्राप्त करू असा विश्वास आहे. निदा दार क्रिकेट पाकिस्तानशी बोलत होती.

आशिया चषकासाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा चेत्री, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलथा, आशा शोभना , राधा यादव, श्रेयांका पाटील, सजना सजीवन.

राखीव खेळाडू - श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कान्वेर, मेघना सिंग.

भारत या स्पर्धेसाठी अ गटात आहे. टीम इंडियाचा सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होईल. १९ जुलै रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत होईल, तर भारताचा दुसरा सामना २१ जुलैला यूएईसोबत होईल. साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात टीम इंडिया २३ जुलै रोजी नेपाळशी भिडेल. हे सर्व सामने श्रीलंकेतील रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवले जातील.

आशिया चषकातील भारताचे सामने -
१९ जुलै - भारत विरूद्ध पाकिस्तान
२१ जुलै - भारत विरूद्ध यूएई
२३ जुलै - भारत विरूद्ध नेपाळ


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:51 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow